भजनी मालिका
← भजनांकडे परत

निंबलोण करूं पंढरीच्या सुखा । आणिक पुंडलीका मायबापा

nimbalon karun pandharichya sukha | anik pundalika mayabapa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निंबलोण करूं पंढरीच्या सुखा । आणिक पुंडलीका मायबापा ॥१॥ पाहतां भूमंडळीं नाहीं आणिक रे । पांडुरंग क्षेत्रा वांचूनियां ॥२॥ अणिमादी सिद्धि भक्तांचिये द्वारीं । होऊनिं कामारि वोळंगती ॥३॥ परलोकीं येती परतोनी मागुसे । सर्व सुख तेथें भोगावया ॥४॥ मुक्तिपद कोणी नघे फुकासाठीं । हिंडे वाळवंटीं दीनरूप ॥५॥ भक्तांचिया पायां पडतो पुढतां पुढती । मज करा सांगती मोक्ष म्हणे ॥६॥ सत्य लोकीं जया सुखाची शिराणी । तें आम्हां अनुदिनीं प्रत्यक्ष दिसे ॥७॥ बंदी जन नामा उभा महा-द्वारीं । कीर्ति चराचरीं वर्णितसे ॥८॥