भजनी मालिका
← भजनांकडे परत

निपुण म्हणती हा आमुचा गुरु । ज्ञानी म्हणति हा परात्परु । योगी म्हणती योग साचारु । याचिपासुनी जन्मला

nipun mhanati ha amucha guru | dnyani mhanati ha paratparu | yogi mhanati yog sacharu | yachipasuni janmala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निपुण म्हणती हा आमुचा गुरु । ज्ञानी म्हणति हा परात्परु । योगी म्हणती योग साचारु । याचिपासुनी जन्मला ॥१॥ याज्ञिक म्हणती भासे कृष्ण । यज्ञरुपीं हा नारायण । वैदिकांही लागले ध्यान । म्हणती वेद मूर्तिमत हाचि दिसे ॥२॥ मला भासे वस्ताद जेठी । शासन करीतया नृपवर श्रेष्ठीं । शस्त्रपाणिया उग्रदृष्टी । सहारकर्ताचि कृष्ण दिसे ॥३॥ वृध्दां भासे सकुमार बाळ । तरुणांगियां मदनमूर्तिचि केवळ । ऐसा सर्वी सर्व हा सकळ । भासे जैसिया तैसाचि ॥४॥ कृष्णाकृती भुललीं लोकें । जाऊंचि विसरली स्त्रिया बाळकें । तंव ते कुब्जा भरुनी तबकें । घेऊनि आलीं सुपरिमळें ॥५॥ उत्तम सुवास चंदनगंध । केशर कुंकम कस्तुरी शुध्द । सुमनहार गुंफिले विविध । सुमनतुरे नानापरी ॥६॥ जात होती राजमंदिरां । तंव त्या देखिलें नंदकुमरा । म्हणे आजींचि हे पूजा सुंदरा । चर्चूं श्रीकृष्णा निजहस्तें ॥७॥