भजनी मालिका
← भजनांकडे परत

निंदा आणि स्तुति तुझीच करणें । परि आणिकांचे न घेणें गुणदोष

ninda ani stuti tujhich karanen | pari anikanche na ghenen gunadosh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निंदा आणि स्तुति तुझीच करणें । परि आणिकांचे न घेणें गुणदोष ॥१॥ वैर अथवा सख्या तुझियेच । परि न पडो ह्रदयीं विसर तुझा ॥२॥ दास्य अथवा सत्ता गोपाळांचे परी । असो तुजवरी सर्वलोभ ॥३॥ जिणें अथवा मरणें तुझियेच द्वारीं । उदास नरहरि करिसी झणें ॥४॥ नामा म्हणे थोर शिणलों पंढरिनाथा । स्वामीचें नेणातां प्रेमसुख ॥५॥