भजनी मालिका
← भजनांकडे परत

निदंक हा घाणा म्हणावा तो जरी

nidank ha ghana mhanava to jari

रचनाकार: संत संताजी · अभंग
निदंक हा घाणा म्हणावा तो जरी । शुभ कार्या आधिं भरतात ।।१।। श्रीकृष्णाचे लग्नी भरीयला घाणा । म्हणवेना कोणा निंदक तो ।।२।। संतु म्हणे म्या तो घाणा भरियला । सिध्दीस तो नेला पांडुरंगे ।।३।।