भजनी मालिका
← भजनांकडे परत

अशीच ती ओढ कोठेँ ती ओढली

ashich ti odh kothen ti odhali

रचनाकार: संत संताजी · अभंग
अशीच ती ओढ कोठेँ ती ओढली । देवा आणि दैत्यांनि मिळोनियां ।। मंथन ते केलेँ सप्त समुद्राचेँ । हाता काय आलेँ काळकुट ।। संतु म्हणे ओढ फार ओढुं नये । तुटेल ती पाहे सहजची ।।