भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक ती ओढ पाहिली कोठेँ होती

anik ti odh pahili kothen hoti

रचनाकार: संत संताजी · अभंग
आणिक ती ओढ पाहिली कोठेँ होती । कृष्णाच्या गोकुळी गोपी हाती ।। घुसळण करी देवकी ती माता । लोणी खात होता जगदात्मा ।। संतु म्हणे माझ्या घाण्याची ती वाढ । जन्माची जोड हेची माझी ।।