भजनी मालिका
← भजनांकडे परत

अशीँ हीँ बाहुलीँ नाचवी पांडुरंग

ashin hin bahulin nachavi pandurang

रचनाकार: संत संताजी · अभंग
अशीँ हीँ बाहुलीँ नाचवी पांडुरंग । जगांत जन्मासी घालुनियां ।। केव्हा केव्हां म्हणे जन्माशीँ येतांच । आखेर बैमानी झालेच ते ।। संतु म्हणे माझा विठ्ठल तूं सखा । आम्हां जन्मासीँ घालुं नका ।।