भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्यानंदे घोषें करितां हरीचें कीर्तन । श्रोते आणि वक्ते होती परम पावन

nityanande ghoshen karitan harichen kirtan | shrote ani vakte hoti param pavan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नित्यानंदे घोषें करितां हरीचें कीर्तन । श्रोते आणि वक्ते होती परम पावन ॥१॥ आणिकहि लोक तरती त्यांच्या सहवासें । भाळया भोळया भाविकांसी लाभ अनायासें ॥२॥ जेथें नित्य नामघोष टाळिया गजर । तेथें रंगी नृत्य करी रुक्मिणीवर ॥३॥ निळा म्हणे तोचि प्रसन्न होउनी दासासी । भुक्ति आणि मुक्ति ठेवी त्यांच्या सहवासीं ॥४॥