भजनी मालिका
← भजनांकडे परत

निंदील हें जन सुखें निंदू द्यावें । सज्जनीं क्षोभावें नये बापा

nindil hen jan sukhen nindu dyaven | sajjanin kshobhaven naye bapa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निंदील हें जन सुखें निंदू द्यावें । सज्जनीं क्षोभावें नये बापा ॥१॥ निंदा स्तुति ज्याला समान पैं झाली । त्याची स्थिति आली समाधीला ॥२॥ शत्रुमित्र ज्याला समसमानत्वें । तोचि पैं देवातें आवडला ॥३॥ माती आणि सोनें ज्या भासे समान । तो एक निधान योगीराज ॥४॥ नामा ह्मणे ऐसे भक्त जे असती । तेणें पावन होती लोक तिन्ही ॥५॥