भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्यानंदाचिया घरा । विवेक पैलतीरा पावविती

nityanandachiya ghara | vivek pailatira pavaviti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नित्यानंदाचिया घरा । विवेक पैलतीरा पावविती ॥१॥ तेचि सद्गुरु संतजन । निजात्मज्ञान फळदाते ॥२॥ वदनीं वसविली वेदोनीती । स्वधर्म स्थापिती सकळांचे ॥३॥ निळा म्हणे नेती धामा । वैकुंठग्रामा विश्रांती ॥४॥