भजनी मालिका
← भजनांकडे परत

निंदील कोणी मज तो निंदूं । अथवा स्तुतिवादु करोत सुखें

nindil koni maj to nindun | athava stutivadu karot sukhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
निंदील कोणी मज तो निंदूं । अथवा स्तुतिवादु करोत सुखें ॥१॥ परि मी गाईन पंढरीनाथा । गुण तत्त्वतां तुमचेचि ॥२॥ आवडी आईक तूं कानीं । अथवा त्यागुनी वोसंडीं तूं ॥३॥ निळा म्हणे देऊनि बळ । वदवितो कृपाळ विश्वजनिता ॥४॥