भजनी मालिका

भजने

गोरा जुनाट पैं जुनें । हातीं थापटणें अनुभवाचें ॥१॥ परब्रह्म म्हातारा निवाला अंतरीं । वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोरियाचे कांता आनंदली चित्तीं । वंदिली माता ती रुक्मादेवी ॥१॥ रुक्मादेवी म्हणे न करा काहीं चिंता । शपथ सर्वथा मुक्त होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोरियाच्या वाडा संत प्रवेशले । गोरियाने देखिले दृष्टीं सर्व ॥१॥ देउनी आसन बैसविलें संतां । तंव ज्ञानदेव पुढतां होउनी बोले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोरियानें केला मनासीं विचार । हाचि एक निर्धार बरा जाहला ॥१॥ लिगाड तें आपोआप मावळलें । विषयांचे जाहलें तोंड काळें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोल्हाट उल्हाट कासया आटाआटी । घेतां संतभेटीं पुरे हेंची ॥१॥ गुद ते पीडन नागिणी दमन । संतदरुशन घडतां जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोवळ देती उष्टावळी । म्हणती गोड हें वनमाळी । घालूनियां श्रीमुख त्या कमळीं । परम संतोषें स्वीकारी ॥१॥ आवडीचें तेचि तें गोड । भाव देखे ज्याचा वाड । त्याचेचि घे येरा निचाड । दांभिका अभिमानायाचें वोसंडी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गोवळसंगे चोरिया करी । शिंकी उतरुनियां बाहेरी । आणि फोडी गोवळकरीं । कवळ देत लोणियाचे ॥१॥ दूध तूप साय लोणी । दहीं हुडकूनियां आणी । खाय लवंडी आणि पोरा लागुनी । देऊनियां धणी सुखी करी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गोवळी होते राखणाईंत । ते ते म्हणती झाला घात । गाई बुजल्या अकस्मात । पडणपात त्या झाला ॥१॥ मग ते आले पायवाटा । पाहाती गाई तंव सुभटा । वत्सें पान्हा घेती घटघटा । पूर लोटले क्षीराचिया सुकाळा । केले वत्सां आणि गोळियां ॥३॥

रचनाकार: संत निळोबा

गोवळे ह्मणती कांहो आह्मां भितो । ब्रह्मदि वंदिती पायधुळी ॥१॥ गाई तृप्त करी कळबाच्या तळीं । सोडिल्या शि-दोरी दावितसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोविंद गुणाचें निधान । गोविंद नयनींचें अंजन । गोविंद बाळकाचें स्थान । गो़विंद चिंतन योगियांचें ॥१॥ गोविंद पांघुरे कांबळा । गोविंद क्रुपे़चा कोंवळा । गोविंद भावालागीं भोळा । गोविदें अजामेळा उद्धरिलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोविंद गोपाळ वदतां वाचे । पायीं यमदूताचें भय नाहीं ॥१॥ नित्य जया ध्यान गोविंद स्मरण । संसारबंधन तया नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥१॥ एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । कल्पितील मनीं यावें जावें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

गोविंदा माधवा केशवा वामना । मायातीता कृष्णा तुज नमों ॥१॥ गोवर्द्धनोद्धरा देवा विश्वंभरा । निर्गुण निराकारा तुज नमों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥१॥ भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥ मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावळ्याचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम