भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोविंद गोविंद । मना लागलिया छंद

govind govind | mana lagaliya chhand

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥ मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥ आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥२॥ तुका म्हणे आळी । जेवी नुरे चि वेगळी ॥३॥