भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोविंद गोपाळ वदतां वाचे । पायीं यमदूताचें भय नाहीं

govind gopal vadatan vache | payin yamadutachen bhay nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोविंद गोपाळ वदतां वाचे । पायीं यमदूताचें भय नाहीं ॥१॥ नित्य जया ध्यान गोविंद स्मरण । संसारबंधन तया नाहीं ॥२॥ उठतां बैसतां खेळतां हासतां । गोविंद गीतीं गातां मोक्ष जोडे ॥३॥ गोविंदाचें नाम सदा ती समाधी । एका जनार्दनीं उपाधी तुटली त्याची ॥४॥