भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोविंदा माधवा केशवा वामना । मायातीता कृष्णा तुज नमों

govinda madhava keshava vamana | mayatita krushna tuj namon

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोविंदा माधवा केशवा वामना । मायातीता कृष्णा तुज नमों ॥१॥ गोवर्द्धनोद्धरा देवा विश्वंभरा । निर्गुण निराकारा तुज नमों ॥२॥ जनार्दना हरि कृपाळू ह्लषिकेशा । पुराणपुरुषा तुज नमों ॥३॥ अव्यक्ता क्षेत्रज्ञ अचिंता कुटस्था भुवनत्रयनाथा तुज नमों ॥४॥ अनंत ब्रह्मांडें तुझिये उदरीं । घनश्यामा हरि तुज नमों ॥५॥ देवराया तुझें कोमळ ह्लदय । कृपादृष्टी पाहें मजकडे ॥६॥ तुझा मी किंकर आहें वासुदेवा । अभय या जीवा देईं आतां ॥७॥ नामा म्हणे घाली चरणासी मिठी । बोले जगजेठी स्वामी माझा ॥८॥