भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोविंद गुणाचें निधान । गोविंद नयनींचें अंजन । गोविंद बाळकाचें स्थान । गो़विंद चिंतन योगियांचें

govind gunachen nidhan | govind nayaninchen anjan | govind balakachen sthan | govind chintan yogiyanchen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोविंद गुणाचें निधान । गोविंद नयनींचें अंजन । गोविंद बाळकाचें स्थान । गो़विंद चिंतन योगियांचें ॥१॥ गोविंद पांघुरे कांबळा । गोविंद क्रुपे़चा कोंवळा । गोविंद भावालागीं भोळा । गोविदें अजामेळा उद्धरिलें ॥२॥ गोविंद बुद्धिची बुद्धि । गोविंद एकली मांदी । गोविंदें हरिली विघ्नव्याधि । गोविदें सिद्धि स्मर-लिया ॥३॥ गोविंद गोकुळपाळक । गोविंद अंगवणें एक । गोविंदें दैत्या लवियला धाक । गोविंद शेष शयनीं ॥४॥ गोविंद आडलि-या काजा कैवारी । गोविंद बुडतियातें तारी । गोविंदा सोळसहस्र नारी । गोविंद बाळ ब्रह्मचारी ॥५॥ गोविंद दान दीक्षा गुरु । गोविंदे अढळ धुरु । गोविंद नामया दातारु । रुक्मिणीवरु गोविंदु ॥६॥