भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोरियाचे कांता आनंदली चित्तीं । वंदिली माता ती रुक्मादेवी

goriyache kanta anandali chittin | vandili mata ti rukmadevi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोरियाचे कांता आनंदली चित्तीं । वंदिली माता ती रुक्मादेवी ॥१॥ रुक्मादेवी म्हणे न करा काहीं चिंता । शपथ सर्वथा मुक्त होय ॥२॥ ऐसें भक्तचरित्र ऐकतां कान । होतसे नाशन महापापा ॥३॥ एका जनार्दनीं पुरले मनोरथ । रामनाम गर्जत आनंदेसी ॥४॥