भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोल्हाट उल्हाट कासया आटाआटी । घेतां संतभेटीं पुरे हेंची

golhat ulhat kasaya ataati | ghetan santabhetin pure henchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोल्हाट उल्हाट कासया आटाआटी । घेतां संतभेटीं पुरे हेंची ॥१॥ गुद ते पीडन नागिणी दमन । संतदरुशन घडतां जोडे ॥२॥ ओहं सोहं यातायाती कोहं जाण । टाकुनि संतचरण धरां आधीं ॥३॥ एका जनार्दनीं मानावा विश्वास । होय देवदास आपोआप ॥४॥