भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोवळे ह्मणती कांहो आह्मां भितो । ब्रह्मदि वंदिती पायधुळी

govale hmanati kanho ahman bhito | brahmadi vanditi payadhuli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोवळे ह्मणती कांहो आह्मां भितो । ब्रह्मदि वंदिती पायधुळी ॥१॥ गाई तृप्त करी कळबाच्या तळीं । सोडिल्या शि-दोरी दावितसे ॥२॥ हमामा घालितां नव्हती माघारें । नाहीं भीत पोरें येत संगें ॥३॥ नामा म्हणे काय भिऊनि राहिले । नि-वांतचि ठेले ब्रह्मदिक ॥४॥