भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोरियानें केला मनासीं विचार । हाचि एक निर्धार बरा जाहला

goriyanen kela manasin vichar | hachi ek nirdhar bara jahala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोरियानें केला मनासीं विचार । हाचि एक निर्धार बरा जाहला ॥१॥ लिगाड तें आपोआप मावळलें । विषयांचे जाहलें तोंड काळें ॥२॥ विठ्ठलें करुणा केली सर्वपरी । तारियेलें भवपुरीं संसाराचें ॥३॥ एका जनार्दनीं खुंटला वेव्हार । नाहीं आन विचार प्रपंचाचा ॥४॥