भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोरा जुनाट पैं जुनें । हातीं थापटणें अनुभवाचें

gora junat pain junen | hatin thapatanen anubhavachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोरा जुनाट पैं जुनें । हातीं थापटणें अनुभवाचें ॥१॥ परब्रह्म म्हातारा निवाला अंतरीं । वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥२॥ सोहं शब्द विरक्ति डवरली आंतरीं । पाहातां आंबरी अनुभव ॥३॥ म्हणे मुक्ताबाई घालूं द्या लोटांगण । जाऊं द्या शरण अव्यक्तासी ॥४॥