भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघी च दान दिली भूमि ॥१॥ अवघा चि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळीं न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा ॥१॥ भक्तीपंथ बहु सोपा पुण्य नागवेया पापा । येणें जाणें खेपा येणें चि एके खंडती॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवचिता त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥१॥ आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो हरी गडियांसि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥१॥ परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो ही भाव आरंभिला ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेजपुंजाळरासी । उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं ॥१॥ जय देवा कृष्णनाथा जय रखुमाईकांता। आरती ओंवाळीन तुम्हां देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अविट हें क्षीर हरीकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥१॥ अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥ काय त्याचे वेल जाईल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अशक्य तों तुम्हां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥ मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अशोकाच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी । येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठुर अतिवादी ॥१॥ अंतरीचा रंग उमटे बाहेरी । वोळखियापरी आपेंआप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रम्ह तें विकारविरहित ॥१॥ तरि म्हणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥ जाईल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अग्नी हा काष्ठ तेवीं । घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम