भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळीं न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा

avaghya vata jhalya kshin kalin na ghade sadhan | uchit vidhi vidhan na kale na ghade sarvatha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळीं न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा ॥१॥ भक्तीपंथ बहु सोपा पुण्य नागवेया पापा । येणें जाणें खेपा येणें चि एके खंडती॥ध्रु.॥ उभारोनि बाहे। विठो पालवीत आहे । दासां मी चि साहे मुखें बोले आपुल्या ॥२॥ भाविक विश्वासी पार उतरिलें त्यांसी । तुका म्हणे नासी कुतऱ्याचे कपाळीं ॥३॥