भजनी मालिका
← भजनांकडे परत

अशक्य तों तुम्हां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया

ashakya ton tumhan nahin narayana | nirjiva chetana anavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अशक्य तों तुम्हां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥ मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ध्रु.॥ थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे । म्हणवितों दास काय थोडें ॥२॥ तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे समर्थाचे ॥३॥