भजनी मालिका
← भजनांकडे परत

असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अग्नी हा काष्ठ तेवीं

ase nandatu ha hari sarvajivin | ase vyapuni agni ha kashtha tevin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अग्नी हा काष्ठ तेवीं । घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥१॥ तृन वाटितां क्षीर हें होत नाहीं । पशू भिक्षतां पालटे तें चि देहीं । तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥२॥ फळ कर्दळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये । धीर नाहीं त्यें वाउगें धीग झालें । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥३॥ असे नाम हें दर्पणें सिद्ध केलें। असे बिंब तें या मळा आहे ठेलें । कसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप। नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥४॥ करा वर्म ठावें नका सोंग वांयां। तुका वीनवीतो पडों काय पायां । त्यज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरलें शेवटीं काय पाहें ॥५॥