भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा

avatar kela sanharave dushta | kariti he nashta parapida

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥१॥ परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो ही भाव आरंभिला ॥२॥ लाविलें लाघव पाहोनियां संधी । सकळांही वधी दुष्टजना ॥३॥ दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणी न साहति ॥४॥ न साहवे दुःख भक्तांचें या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥५॥ रूप हें चांगलें रामकृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारितां ॥६॥ उच्चारितां नाम कंस वैरभावें । हरोनियां जीवें कृष्ण केला ॥७॥ कृष्णरूप त्यासि दिसे अवघें जन । पाहे तों आपण कृष्ण झाला ॥८॥ पाहिलें दर्पणीं आधील मुखासि । चतुर्भुज त्यासि तोचि झाला ॥९॥ झालीं कृष्णरूप कन्या पुत्र भाज । तुका म्हणे राज्य सैन्य जन ॥१०॥