भजनी मालिका
← भजनांकडे परत

असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठुर अतिवादी

asant lakshan bhutancha matsar | manas nishthur ativadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठुर अतिवादी ॥१॥ अंतरीचा रंग उमटे बाहेरी । वोळखियापरी आपेंआप ॥ध्रु.॥ संत ते समय वोळखती वेळ । चतुष्ट निर्मळ चित्त सदा ॥२॥ तुका म्हणे हित उचित अनुचित । मज लागे नित विचारावें ॥३॥