भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवचित या तुमच्या पायां । देवराया पावलों

avachit ya tumachya payan | devaraya pavalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवचित या तुमच्या पायां । देवराया पावलों ॥१॥ बरवें झालें देशाउर । आल्या दुर सारिखें ॥ध्रु.॥ राहोनियां जातों ठाया । आलियाची निशानी ॥२॥ तुका म्हणे चरणसेवा । जोडी हेवा लाधली ॥३॥