भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही

avishvasiyachen sharir sutaki | vital pataki bhed vahi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥ काय त्याचे वेल जाईल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥ध्रु.॥ मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचें धोंडा उभा ठाके ॥२॥ तुका म्हणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं जाणा खोटा तैसा ॥३॥