भजनी मालिका
← भजनांकडे परत

असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रम्ह तें विकारविरहित

asantin kantala ha navhe matsar | bramha ten vikaravirahit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रम्ह तें विकारविरहित ॥१॥ तरि म्हणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥ सिजलें हिरवें एका नांवें धान्य । सेवनापें भिन्न निवडे तें ॥२॥ तुका म्हणे भूतीं साक्षी नारायण । अवगुणीं दंडण गुणीं पुजा ॥३॥