चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या
chari ved jyachi kirti vakhaniti | bandhavi to hatin gaulanichya
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥ गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
chari ved jyachi kirti vakhaniti | bandhavi to hatin gaulanichya
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥ गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥
chal kelasi mokala | bol viththal velovelan
चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥१॥ तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥
chal ghara ubha rahen narayana | thevun de charananvari matha
चाल घरा उभा राहें नारायणा । ठेवूं दे चरणांवरी माथा ॥१॥ वेळोवेळां देई क्षेमआलिंगन । करी अवलोकन कृपादृष्टी ॥ध्रु.॥
chalava panth to pavije tya thaya | aikilya vanyan varata tya
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥१॥ ऐका जी वोजे पडतसें पायां । भावाचि तें जायावाट नव्हे ॥ध्रु.॥
chaliti ad vata | anikan draviti je nita
चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा ॥१॥ न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥
chalilen na vate | gauniyan jatan vate
चालिलें न वाटे । गाऊनियां जातां वाटे ॥१॥ बरवा वैष्णवांचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥ध्रु.॥
chalile sobati | kay manili nishchiti
चालिले सोबती । काय मानिली निश्चिती ॥१॥ काय करिसी एकला । काळ सन्निध पातला ॥ध्रु.॥
chalen dandavat ghalin narayana | apulya kalyana laguniyan
चालें दंडवत घालीं नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनियां ॥१॥ बैसविला पदीं पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरीं आज्ञा त्याची ॥२॥
chale hen sharir konachiye satte | kon bolaviten harivin
चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१॥ देखवी ऐकवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नको ॥ध्रु.॥
chalavanen kay | aisen age majhe may
चाळवणें काय । ऐसें अगे माझे माय ॥१॥ धांव पाव लवलाहें । कंठीं प्राण वाट पाहे ॥ध्रु.॥
chahadachi mata | vyabhicharin tatvata
चाहाडाची माता । व्यभिचारीण तत्वता ॥१॥ पाहे संतांचें उणें । छिद्र छळावया सुनें ॥ध्रु.॥
chintanachi jodi | hachi labh ghadoghadi
चिंतनाची जोडी । हाचि लाभ घडोघडी ॥१॥ तुम्ही वसूनि अंतरीं । मज जागवा निर्धारीं ॥ध्रु.॥
chintanasi na lage vel | sarva kal karaven
चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावें ॥१॥ सदा वाचे नारायण । तें वदन मंगळ ॥ध्रु.॥
chintanen achint rahilon nishchal | ten chi kiti kal vadhavaven
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥१॥ अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥
chintanen sare to dhanya dhanya kal | sakal mangal mangalanchen
चिंतनें सरे तो धन्य धन्य काळ । सकळ मंगळ मंगळांचें ॥१॥ संसारसिंधु नाहीं हरीदासा । गर्भवास कैसा नेणती ते ॥ध्रु.॥
chinta te palali gokulabaheri | pravesh bhitari kela deven
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥ देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥
chinta nahin ganvin vishnudasanchiye | ghosh jayajayakar sada
चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥१॥ नारायण घरीं सांठविलें धन । अवघे चि वाण तया पोटीं ॥ध्रु.॥
chintamanideva ganapatisi ana | karavaven bhojana duje patrin
चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥१॥ देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥
chintilen ten maninche janen | puravi khune antarinchen
चिंतिलें तें मनिंचे जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥१॥ रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥
chintile pavalin jayan krushnabheti | eravin te ati vanyanvin
चिंतीले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥१॥ वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥२॥