भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालिले सोबती । काय मानिली निश्चिती

chalile sobati | kay manili nishchiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चालिले सोबती । काय मानिली निश्चिती ॥१॥ काय करिसी एकला । काळ सन्निध पातला ॥ध्रु.॥ कांहीं सावध तो बरवा । करीं आपुला काढावा ॥२॥ चालिले अगळे । हळू च कान केश डोळे ॥३॥ वोसरले दांत । दाढा गडबडल्या आंत ॥४॥ एकली तळमळ । जिव्हा भलतेचि चावळे ॥५॥ तुका म्हणे यांणीं । तुझी मांडिली घालणी ॥६॥