भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावें

chintanasi na lage vel | sarva kal karaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावें ॥१॥ सदा वाचे नारायण । तें वदन मंगळ ॥ध्रु.॥ पढिये सर्वोत्तमा भाव । येर वाव पसारा ॥२॥ ऐसें उपदेशी तुका । अवघ्या लोकां सकळां ॥३॥