गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव
govindachen nam god ghetan vache | tethen he kainche vairabhav
गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥१॥ भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरी ॥२॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
govindachen nam god ghetan vache | tethen he kainche vairabhav
गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥१॥ भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरी ॥२॥
govindavanchoni vade jyachi vani | hagavan ghani pitapit te
गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥१॥ मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावळ्याचा ॥ध्रु.॥
goho yava ganva | aise navas kari ava
गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥१॥ कैचें पुण्य तिये गांठी । व्रतें वेची लोभासाठी ॥ध्रु.॥
gaurav gauravapuraten | phal satyache sankalpa
गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्प ॥१॥ कठिण योगाहुनि क्षम । ओकलिया होतो श्रम ॥ध्रु.॥
gaulani alya vaj | mhanati ya ge rakhon aj | sampadavuni majagharant dharuni kondunni | ughaden kavad ubhya kaloshache ad | sata pancha ek bhid maunenchi thelya
गौळणी आल्या वाज । म्हणती या गे राखों आज । सांपडवुनी माजघरांत धरुनी कोंडूंनी । उघडें कवाड उभ्या काळोशाचे आड । साता पांचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥१॥ नित्य सोंकवला नेदी । सांगों चित्त बोला । आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ध्रु.॥
gaulani bandhiti dharanasi gala | khele tya gopalammaji bramha
गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह ॥१॥ धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठीं ॥ध्रु.॥
gauliyachi takapiren | kon poren changalin
गौळीयाची ताकपिरें । कोण पोरें चांगलीं ॥१॥ येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ध्रु.॥
granthache artha nenati he khal | bahu anargal jale vishayin
ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥१॥ नाहीं भेद म्हणून भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥२॥
ghatin alipta ase ravi | agni kashthamaji jevi | taisa narayan jivin | jivasakshivartanen
घटीं अलिप्त असे रवि । अग्नी काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥१॥ भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥
ghadiya ghaluni talin chalati vanamali | umatati komalin kunkumachin
घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥१॥ वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ध्रु.॥
gharin randa poren marati upavasin | sange lokampasin thorapan
घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥ नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥
gharogharin avaghen len bramhadnyan | pari melavan bahu maji
घरोघरीं अवघें लें ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥ निरें कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु.॥
gharogharin bahu jale kavi | nene prasadachi chavi
घरोघरीं बहु जाले कवि । नेणे प्रसादाची चवी ॥१॥ लंडा भूषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥ध्रु.॥
ghatala dukan | deti aliyasi dan
घातला दुकान । देती आलियासी दान ॥१॥ संत उदार उदार । भरलें अनंत भांडार ॥ध्रु.॥
ghatala dukan | padhiye taisa ahe van
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥१॥ आम्ही भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥
ghaliti pavhaya | vate anathachya daya
घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥१॥ तैसें कां हें नये करूं । पांडुरंगा आम्हां तारूं ॥ध्रु.॥
ghali kavad talali vad rati | kamen vyapilin kan padili dushchitti
घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिलीं कां पडिली दुश्चित्ती । कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजि शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥१॥
ghalin bhar deva | na lage desh doi ghyava
घालीं भार देवा । न लगे देश डोई घ्यावा ॥१॥ देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥
ghaluniyan bhar rahilon nishchitin | niravilen santin vithobasi
घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविलें संतीं विठोबासि ॥१॥ लावूनियां हात कुरवाळिला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ध्रु.॥
ghaluniyan mapin | devabhakti baisale japin
घालुनियां मापीं । देवभक्ती बैसले जपीं ॥१॥ तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुडी ॥ध्रु.॥