भजनी मालिका
← भजनांकडे परत

गौळीयाची ताकपिरें । कोण पोरें चांगलीं

gauliyachi takapiren | kon poren changalin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गौळीयाची ताकपिरें । कोण पोरें चांगलीं ॥१॥ येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ध्रु.॥ काय उपास पडिले होते । कण्याभोंवते विदुराच्या ॥२॥ तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥३॥