भजनी मालिका
← भजनांकडे परत

घटीं अलिप्त असे रवि । अग्नी काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें

ghatin alipta ase ravi | agni kashthamaji jevi | taisa narayan jivin | jivasakshivartanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घटीं अलिप्त असे रवि । अग्नी काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥१॥ भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥ देह संकल्पासारिखें । एक एकांसी पारिखें । सुख आणि दुःखें । अंगी कर्में त्रिविध ॥२॥ तुका म्हणे कोडें । न कळे तयासी सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥३॥