भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥१॥ अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥ आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

गेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥१॥ रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि माझें माझें ॥१॥ सळे धरोनि बैसला काळ । फाकों नेदी घटिका पळ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥१॥ इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें । म्हणतां पाप गेलें । विठ्ठलसें वाचेसी ॥१॥ सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । महापातकी चांडाळ । नामासाठी आपुलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥१॥ वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मीमाजी अंगें हारपलीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गोपाळ म्हणती कान्होबा या रे कांहीं मागों । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगों । एक म्हणती उगे रे उगे रे उगे रे मागेंचि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजि अवघेचि जागों ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची ॥१॥ झालें काय ऐसें न कळे कोणासी । म्हणती तुम्हांपासीं देव होता ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

गोपीचंदन मुद्रा धारणें । आम्हां लेणें वैष्णवां ॥१॥ मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गोमटया बीजाचीं फळें ही गोमटीं । वाहे तें चि पोटीं समतुक ॥१॥ जातीच्या संतोषें चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी काय करी तेथें । झाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पंथें ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥१॥ एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । कल्पितील मनीं यावें जावें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम