भजनी मालिका
← भजनांकडे परत

गेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये

gela tari javo sukhen narakasi | kalanki yavishin shivon naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥१॥ रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥ उगी च कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥२॥ तुका म्हणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥३॥