भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोड नांवें क्षीर । परी साकरेचा धीर

god nanven kshir | pari sakarecha dhir

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गोड नांवें क्षीर । परी साकरेचा धीर ॥१॥ तैसें जाणा ब्रम्हज्ञान । बापुडें तें भक्तीविण ॥ध्रु.॥ रुची नेदी अन्न । ज्यांत नसतां लवण ॥२॥ अंधळ्याचे श्रम । शिकविल्याचें चि नाम ॥३॥ तुका म्हणे तारा । नाव तंबुऱ्याच्या सारा ॥४॥