भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरोघरीं अवघें लें ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी

gharogharin avaghen len bramhadnyan | pari melavan bahu maji

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घरोघरीं अवघें लें ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥१॥ निरें कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु.॥ आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥२॥ काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥३॥ निंदा अहंकार द्वेष बहु फार । माजी वरी धूर सारियला ॥४॥ तुका म्हणे तेथें कांहीं हातां नये । आयुष्य मोलें जाये वांयांविण ॥५॥