भजनी मालिका
← भजनांकडे परत

ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं

granthache artha nenati he khal | bahu anargal jale vishayin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥१॥ नाहीं भेद म्हणून भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥२॥ तुका म्हणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं नष्ट ॥३॥