भजनी मालिका
← भजनांकडे परत

चाल घरा उभा राहें नारायणा । ठेवूं दे चरणांवरी माथा

chal ghara ubha rahen narayana | thevun de charananvari matha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चाल घरा उभा राहें नारायणा । ठेवूं दे चरणांवरी माथा ॥१॥ वेळोवेळां देई क्षेमआलिंगन । करी अवलोकन कृपादृष्टी ॥ध्रु.॥ प्रक्षाळूं दे पाय बैसें माजघरीं । चित्त स्थिर करीं पांडुरंगा ॥२॥ आहे त्या संचितें करवीन भोजन । काय न जेवून करिसी आतां ॥३॥ करुणाकरें नाहीं कळों दिलें वर्म । दुरी होतां भ्रम कोण वारी ॥४॥ तुका म्हणे आतां आवडीच्या सत्ता । बोलिलों अनंता करवीन तें ॥५॥