भजनी मालिका
← भजनांकडे परत

चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां

chal kelasi mokala | bol viththal velovelan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥१॥ तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥ पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां न लगे घडी ॥२॥ केलीं मागें नको राहों । तुज जमान आम्ही आहों ॥३॥ करीं तुजसी करवती । आणिक नामें घेऊं किती ॥४॥ तुका म्हणे काळा । रीग नाहीं निघती ज्वाळा ॥५॥