भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतिलें तें मनिंचे जाणें । पुरवी खुणे अंतरींचें

chintilen ten maninche janen | puravi khune antarinchen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चिंतिलें तें मनिंचे जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥१॥ रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥ नवसियाचे पूर्वी पुरवी नवस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥२॥ तुका म्हणे समचि देणें । समचरण उभा असे ॥३॥