भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतनें सरे तो धन्य धन्य काळ । सकळ मंगळ मंगळांचें

chintanen sare to dhanya dhanya kal | sakal mangal mangalanchen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चिंतनें सरे तो धन्य धन्य काळ । सकळ मंगळ मंगळांचें ॥१॥ संसारसिंधु नाहीं हरीदासा । गर्भवास कैसा नेणती ते ॥ध्रु.॥ जनवन ऐसें कृपेच्या सागरें । दाटला आभारें पांडुरंग ॥२॥ तुका म्हणे देवा भक्तांचे बंधन । दाखविलें भिन्न परी एक ॥३॥