भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतनाची जोडी । हाचि लाभ घडोघडी

chintanachi jodi | hachi labh ghadoghadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चिंतनाची जोडी । हाचि लाभ घडोघडी ॥१॥ तुम्ही वसूनि अंतरीं । मज जागवा निर्धारीं ॥ध्रु.॥ जेथें जेथें जाय मन । आड घाला सुदर्शन ॥२॥ तुका म्हणे भोजें । मग मी नाचेंन निर्ल्लज ॥३॥