भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा

chinta nahin ganvin vishnudasanchiye | ghosh jayajayakar sada

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥१॥ नारायण घरीं सांठविलें धन । अवघे चि वाण तया पोटीं ॥ध्रु.॥ सवंग सकळां पुरे धणीवरी । सेवावया नारी नर बाळा॥२॥ तुका म्हणे येणें आनंदी आनंदु । गोविंदें गोविंदु पिकविला॥३॥