भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालिलें न वाटे । गाऊनियां जातां वाटे

chalilen na vate | gauniyan jatan vate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चालिलें न वाटे । गाऊनियां जातां वाटे ॥१॥ बरवा वैष्णवांचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥ध्रु.॥ नाहीं भय आड । कांहीं विषमांचें जड ॥२॥ तुका म्हणे भक्ती । सुखरूप आदीं अंतीं ॥३॥