भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

मागें बहुतांसि वांटिलें । पुढें आणिकांहि ठेवलें । भावें विश्वासिते पावले । अधिकारिया दिधले अधिकार ॥१॥ चतुरा चतुरशिरोमणी । सकळां जाणतियांचा धणी । करुं जाणतो वांटणी । भाग जैसें त्यापरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझया मीपणचा करोनि फराळ । उरलें खावयासी बैसला सकळ । ऐसा भुकाळु हा नंदाचा गोवळ । यासि न पुरेचि ग्रासितां माझा खेळ वो ॥१॥ आतां काय देऊं नसंता जवळी । संचितप्रारब्ध तें भक्षिले समुळीं । कर्माकर्माच्या घेतल्या कवळी । विषयवासना त्या ग्रासिल्या निमिषमेळिं वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझा विठो नव्हेचि तैसा । उदारपणें ज्याचा ठसा ॥१॥ नामाचि एक स्मरल्यासाठी । गणिका बैसविली वैकुंठी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझिया भावाचें खंडण । नव्हे ऐसें करा दान । मुखी नाम तुमचें स्‍मरण । राहो चरणावरीं दृष्टी ॥१॥ आणखी मी न मागें कांहीं । वसो प्रेम तुमच्या ठायीं । करुनि कृपा आठव देई । आवडी कीर्तनीं सर्वदां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझिया मनें धरिला विश्वास । तुमच्या नामीं घातली कास । नाहीं उपेक्षा आणि आळस । तुमच्या ठायीं शरणांगत ॥१॥ बहुतां सांभाळिलें देवा । केला बहुतांचा कुडावा । बहुतां दानें वाढल्या सेवा । बहुतां स्थपिलें निजपदीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझिये मनीं बैसला हरी । नयनामाझारीं कोंदला ॥१॥ भरोनियां मना बुध्दी । राहिला संधीं इंद्रियांच्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझिये मनीं विश्रांती वाटे । देखतां गोमटे विटे चरण ॥१॥ तुळशीमाळा शोभल्या कंठी । प्रकाश मुगुटीं रत्नांचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझिये मनीचा फिटला बेहो । देखताचि नाहो रुक्मीणीचा ॥१॥ कळिकाळ ते काय बापुडें रंक । होऊनि मशक ठेलें पुढें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझिये वाचेसी नाहीं धीर । प्रसवते भार अक्षरांचे ॥१॥ तुमचे कृपेचा हा महिमा । पुरुषोत्तमा अगाध ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझी पूजा हेंचि अर्चन । तुमचें नामसंकीर्तन । नेणें करुं वेदाध्ययन । नेणें आसन योगाचें ॥१॥ म्हणोनि येतों काकुलती । अत्यंत मूढ आहे माझी मती । नेणें करुं तुमची स्तुती । अहो जगत्पती पुराणपुरुषा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझी मजचि वो पडियली भुली । गेलें मर्यादा वो विसरोनि आपुली । याची अणुमात्र पडतांचि साउली । वृत्ति तदाकार होऊनियां ठेली वो ॥१॥ आलें वाचें तेंचि करितें बडबड । नये भ्रांतीचें वो वस्त्र दृष्टी आड । मना आलें तैसा नाचतें धुमाड । नेणों काय पुढें आरंभला नाड वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझें मजचि वो आतुडलें गुज । नाहीं आणिकांचे कामा आलें काज । सांडिली लौकिकाची बरें झालें लाज । तेणें लाधलीये निजाचेंही निज वो ॥१॥ पडिली गांठी या गुणसवें । एकनिष्ठ वो शरण जातां भावें । मनीचें राखतां वो आर्त नित्य नवे । झाला प्रसन्न हा देवाचाही देव वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझें माझे हातीं हीत । दिधलें संतमुनिश्वरीं ॥१॥ काय उत्तीर्ण होऊं कैसा । उपकारें आकाशा झांकोळिलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा