भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें मजचि वो आतुडलें गुज । नाहीं आणिकांचे कामा आलें काज । सांडिली लौकिकाची बरें झालें लाज । तेणें लाधलीये निजाचेंही निज वो

majhen majachi vo atudalen guj | nahin anikanche kama alen kaj | sandili laukikachi baren jhalen laj | tenen ladhaliye nijachenhi nij vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझें मजचि वो आतुडलें गुज । नाहीं आणिकांचे कामा आलें काज । सांडिली लौकिकाची बरें झालें लाज । तेणें लाधलीये निजाचेंही निज वो ॥१॥ पडिली गांठी या गुणसवें । एकनिष्ठ वो शरण जातां भावें । मनीचें राखतां वो आर्त नित्य नवे । झाला प्रसन्न हा देवाचाही देव वो ॥२॥ याचिलागीं म्या सोशिले गर्भवास । घेतले जन्म वो याचीच केली आस । नाहीं देखिले वो कोणाचे गुणदोष । म्हणेनि कृपावंत झाला हा परेश वो ॥३॥ जें जें अर्चिलें तें सुकृत याचिसाठीं । नाही वेंचिले वो जतन केलें गांठी । भोगी त्यागी वो याचि वरी दिठी । म्हणोनि आजि हा लाधले जगजेठी वो ॥४॥ धरिलें जन्म तें सार्थक झालें माय । भेटवूनी याशीं वो फळलें उपाय । चुकले अवघेचि अघात अपाय । म्हणोनि आलिंगन देती यादवराय वो ॥५॥ केलें ब्रीद वो साच येणें काळें । अनाथबंधु हे दीनाच्या दयाळें । केली कृपा वो पुरविले सोहळें । म्हणोनि निळा नित्य चरणावरीं लोळे वो ॥६॥